Sandip Kapde
सध्या बऱ्याच लोकांना सोशल मीडियावर वेळ घालवायला आवडतो आणि त्यातून आपल्याला आता सर्व गोष्टी चांगल्या माहीत झाल्या आहेत आणि आपण त्यात तज्ज्ञ झाल्याचा भासही त्यांना होऊ लागतो.
त्यात त्यांना कोणी रिव्ह्यू द्या म्हटल्यावर, हे सर्व उच्चशिक्षित लोक अधिक पैसे कमवायच्या मागे लागत आहेत.
फावल्या वेळात अमुक साईटचा रिव्ह्यू करा, हॉटेलचा रिव्ह्यू करा, सोशल मीडियावरील जाहिरातींना, चित्रफितींना लाईक करा आणि भरपूर पैसे मिळवा, अशा जाहिरातींना हे लोक बळी पडत आहेत.
यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. तुमच्या सोबतही फसवणूक झाली तर काय कराल, हे आम्ही तुम्हाला सांगतो
ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
९३० या नंबरवर संपर्क साधावा. या नंबरवरची यंत्रणा ज्या खात्यात पैसे गेले आहेत, ते गोठवण्याचे तातडीने प्रयत्न करतात.
आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलावे आणि झालेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती न लपवता द्यावी.
आपल्या फोनवर किंवा कॉम्प्युटरवर असलेले या संदर्भातील काही पुरावे / संदर्भ असतील तर जपून ठेवावेत, त्याच्या प्रिंट काढाव्यात, ते करण्यासाठी संगणक सल्लागाराची मदत घ्यावी.
हे एवढ्यासाठी करायचे की पुढे जाऊन आपल्याला हे पुरावे कोर्टात जरूर पडल्यास देता येतील आणि संपूर्ण तपशील आपल्याकडे राहील.
संगणकतज्ज्ञ व्यक्तीकडून आपले संगणकाचे Computer forensics Image म्हणजे पूर्णपणे सुरक्षित अशी कॉपी वेगळी तयार करावी. त्यामुळे संगणकात त्या काळात घडलेल्या सर्व गोष्टी सुरक्षित वेगळ्या जशाच्या तशा राहतील.
शक्य असेल आणि आवश्यक असेल तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
आपले बँक खात्यांचा आणि ई-मेलचा पासवर्ड वारंवार बदलावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.