Anuradha Vipat
OTT प्लॅटफॉर्म Netflix वर दाखवल्या जाणाऱ्या 'अन्नपूराणी' या चित्रपटावर भगवान श्रीरामाचा अपमान आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये धार्मिक भावना भडकावल्याबद्दल एका हिंदू संघटनेने चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्री नयनतारा यांच्यासह संपूर्ण स्टारकास्टविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
हिंदू सेवा परिषदेचे अतुल जेसवानी म्हणाले की, अन्नपूर्णी चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, जी हिंदू धर्मातील पूजनीय मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचा अपमान करतात.
चित्रपटात भगवान श्रीराम यांच्या विरोधात अयोग्य कमेंट करून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जेसवानी यांच्या मते, चित्रपटात लव्ह जिहाद दाखवण्यात आला आहे.
प्रभू श्री राम वनवासात प्राण्यांना मारायचे आणि मांस भक्षण करायचे हेही चित्रपटाच्या कलाकाराने दाखवले आहे.
पोलिसांनी नीलेश कृष्णा (दिग्दर्शक), नयनतारा (कलाकार), जतिन सेठी (निर्माता), आर रवींद्रन (निर्माता), पुनित गोयका (निर्माता), सारिक पटेल आणि मोनिका शेरगिल यांच्याविरुद्ध कलम १५३ आणि ३४ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.