सकाळ डिजिटल टीम
हल्ली रील बनवणं फेमस होणं प्रत्येकाला आवडतं. पण विचार करा रील बनवल्याने तुम्हाला थेट तुरुंगात जाव लागल तर...
अश्याच एका प्राध्यापिकेची रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
या व्हिडीओमध्ये पाटलिपुत्र विद्यापीठ,पटनाच्या (PPU) परीक्षा पेपर तपासताना एक प्राध्यापिका रील बनवत आहे असे दिसत आहे.
या व्हिडिओमुळे शिक्षकांची जबाबदारी आणि कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
ही प्राध्यापिका विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहे. पेपर तपासण्याऐवजी ती रील बनवण्यात व्यस्त आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे मूल्यांकन योग्य प्रकारे झाले नाही तर? अशी शंका उपस्थित करून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
@AjeyPPatel या यूजरने हा व्हिडिओ सर्वप्रथम पोस्ट केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाला.
स्थानिक वृत्तमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवर FIR दाखल करण्यात आली आहे