Saisimran Ghashi
दिवाळीला सुरुवात झाली आहे आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके विक्री सुरू आहे.
यंदाच्या दिवाळीमध्ये मार्केटमध्ये फटाक्यांना आंतरराष्ट्रीय तानाशाह आणि काही नेत्यांची नावं देण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय.
इराकचा तानाशाह सद्दाम हुसेन याच्या नावानेही विविध प्रकारचे फटाके बाजारात आले आहेत.
उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग याच्या नावाने मोठे फटाके तयार केले गेले आहेत.
ओसामा बिन लादेन याच्या नावाने दिवाळीच्या बंदुकीतील गोळ्या बनवण्यात आल्या आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मोदी का धमाका चॉकलेट बॉम्ब मार्केटमध्ये आला आहे.
नाझी जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्या नावानेही फटाके बनवले गेले आहेत.
काहींना ही फॅशन विनोदी वाटत असली तरी, काहींना हे वादग्रस्त वाटतंय. सोशल मीडियावर याबद्दल चर्चेला उधाण आले असून, लोकांचे वेगवेगळे मत आहेत.