सकाळ डिजिटल टीम
मेंदूच्या (Brain) उत्तम आरोग्यासाठी मत्स्याहार लाभदायक ठरतो, असं संशोधक सांगतात. आठवड्यातून दोन वेळा अशा माशांचे सेवन केल्यावर मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
टुना माशाला मराठीत ‘कुपा’ असे म्हणतात. हा एक लोकप्रिय मासा आहे ज्यामध्ये ‘ओमेगा-3’ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
सार्डिन माशाला मराठीत ‘तारली’ मासा म्हटले जाते. हा एक छोटा मासा असतो, ज्यामध्ये ‘ओमेगा-3’ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. हा मासा मेंदूच्या आरोग्याला चालना देण्यासाठी हा एक किफायतशीर मार्ग मानला जातो.
मॅकेरल माशाला मराठीत ‘बांगडा मासा’ म्हणतात. हा हेरिंगप्रमाणेच छोट्या आकाराचा मासा असतो, ज्यामध्ये ‘ओमेगा-3’ ईपीए आणि डीएचएचे प्रमाण अधिक असते.
सॅमन माशाला मराठीत ‘रावस’ असे म्हणतात. हा मासा ‘ओमेगा-3’ फॅटी अॅसिडसह ‘ड’ जीवनसत्व तसेच ‘ई’ व अनेक प्रकारच्या ‘बी’ जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे. या माशाच्या सेवनाने मेंदूला अतिशय लाभ मिळतो.
हेरिंग माशाला मराठीत भिंग, पाला तसेच दवाक मासा अशी नावे आहेत. हेरिंग हा लहान, तेलकट माशांचा एक प्रकार आहे. डिमेंशियासारख्या मेंदूच्या आजाराला दूर ठेवण्यासाठी या माशाचे सेवन गुणकारी ठरते.