अनिरुद्ध संकपाळ
युरो कप 2024 ची सुरूवात झाली आहे. यजमान जर्मनी आणि स्कॉटलँड सामन्याने स्पर्धेचा नारळ फुटला.
यंदाच्या युरो कपमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंवर फुटबॉल प्रेमींची नजर असणार आहे. यातील अनेकांचा हा शेवटचा युरो कप असण्याची शक्यता आहे.
या यादीत पहिलं नाव हे अर्थातच पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचं आहे. त्याने युरो कपमध्ये सर्वाधिक 14 गोल केले आहेत.
जर्मनीचा टोनी करूस हा युरो कप 2024 नंतर निवृत्ती घेणार आहे. मायदेशात होत असलेल्या युरो कपमध्ये जर्मनीला विजय मिळवून देण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
क्रोएशियाचा स्टार फुटबॉलपटू लुका मॉड्रिच आता 38 वर्षाचा झाला आहे. त्याचा हा शेवटचा युरो कप असण्याची शक्यता आहे.
इंग्लंडचा ज्युड बेलिंगहमने यंदाच्या हंगामात रियल माद्रिदकडून 23 गोल केले आहेत. तो इंग्लंडला युरो कप जिंकून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे.
फ्रान्सचा स्टार किलियन एम्बाप्पेवरही सर्व फुटबॉल चाहत्यांचे लक्ष असणार आहे. तो आता फ्रान्सचा कर्णधार देखील असणार आहे. त्यामुळं यंदाचा युरो कप त्याच्यासाठी खास असणार.