रोहित कणसे
पहिल्यांदा विमानाने प्रवास करणे प्रत्येकासाठी खूप खास क्षण असतो आणि यासाठी बऱ्याचदा लोक खूप उत्साहात असतात.
तर उत्साहासोबतच अनेकांना याची भीती देखील वाटू शकते, विमानाने प्रवास करण्यापूर्वी, एअरलाइन्सच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असते.
तुमचा पहिला हवाई प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा.
तुमच्याकडे ई-तिकीट असले तरी विमानतळावर जाण्यापूर्वी तिकीटाची प्रिंट काढा, ऐनवेळी अडचण होणार नाही.
फ्लाइटच्या वेळेच्या किमान दोन-अडीच तास आधी विमानतळावर पोहोचा कारण चेक-इन, सिक्युरिटी चेक वगैरेला खूप वेळ लागतो.
तुमच्या हँडबॅगमध्ये नेहमी वैध आयडी (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) ठेवा, कारण विमानप्रवासात हे फार महत्वाचे आहेत.
चाकू, कात्री, सुई इत्यादी कोणतीही धारदार वस्तू सोबत ठेवू नका. विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान या गोष्टी बाहेर ठेवाव्या लागतात.
तुम्ही फ्लाइटमध्ये फक्त ठराविक वजनानुसार सामान घेऊन जाऊ शकता, हे दोन गोष्टींवर अवलंबून असते पहिली कोणत्या विमान कंपनीचे तिकीट आहे आणि दुसरी कोणत्या क्लासचे तिकीट बुक केले आहे.
प्रत्येक एअरलाइनचे नियम वेगळे असू शकतात, त्यामुळे जाण्यापूर्वी तुमच्या एअरलाइनचे नियम काळजीपूर्वक वाचा.
घड्याळ डाव्या हातावर का घातले जाते? कारण जाणून घ्या