Sudesh
आजकाल लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात.
लहान मुलं शांत बसावीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो. मात्र याचा दुष्परिणाम होताना दिसून येत आहे.
यामुळेच अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याने लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध लागू केले आहेत.
या ऐतिहासिक निर्णयानंतर आता राज्यातील 14 वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांच्या सोशल मीडिया वापरण्यावर बंधनं येणार आहेत.
फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसेंटिस यांनी याबाबतच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.
यामधील नियमानुसार, 1 जानेवारी 2025 नंतर फ्लोरिडामधील 14 वर्षांखालील मुलांना आई-वडिलांच्या संमतीशिवाय सोशल मीडिया वापरता येणार नाही.
ज्या लहान मुलांचे अकाउंट आधीपासून आहेत, त्यांनाही 90 दिवसांच्या आत आपले अकाउंट्स डिलीट करावे लागतील.
एखाद्या आई-वडिलांनी मागणी करूनही त्यांच्या लहान मुलांच अकाउंट हटवलं गेलं नाही, तर सोशल मीडिया कंपनीला 10 हजार डॉलर्सचा दंड होऊ शकतो.