Kaas Pathar : कास पठारावर निर्सग बहरला; रंगीबेरंगी फुलांची उधळण एक सप्टेंबरला?

सकाळ डिजिटल टीम

जागतिक वारसा स्थळ

जागतिक वारसा स्थळ आणि विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर (Kas Pathar) फुलांचा (Flower Season) सडा बहरण्यास अजून अवधी आहे.

Flower season in Kaas Plateau | esakal

कासवर रंगाची उधळण

कासवर खरी रंगाची उधळण एक सप्टेंबर नंतरच पाहायला मिळणार आहे.

Flower season in Kaas Plateau | esakal

शुल्कात यावर्षी वाढ

कास पठारावरील फुले पाहण्यासाठी गतवर्षी असलेल्या शंभर रुपये शुल्कात यावर्षी वाढ करण्यात आली आहे.

Flower season in Kaas Plateau | esakal

दीडशे रुपये मोजावे लागणार

यावर्षी प्रतिव्यक्ती दीडशे रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, यावर्षी पार्किंग शुल्क व पार्किंग वरून पठारावर येण्यासाठी असणाऱ्या बसचं शुल्क माफ करण्यात आलंय.

Flower season in Kaas Plateau | esakal

कास पठार समितीचा निर्णय

याबाबतचा निर्णय कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आल्याचे अध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी सांगितले.

Flower season in Kaas Plateau | esakal

विविधरंगी फुले बहरली

सध्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी ही फुले बहरत असून पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फुल ही दिसू लागले आहे.

Flower season in Kaas Plateau | esakal

कास परिसरात रिमझिम पाऊस

कास परिसरात सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके, रिमझिम पाऊस व अंगाला झोंबणारा गार वारा असं मस्त वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flower season in Kaas Plateau | esakal