Kaas Pathar : कास पठारावर फुलांचा अधिकृत हंगाम सुरू; रानफुलांनी बहरलं सौंदर्य

सकाळ डिजिटल टीम

'कास' पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय

आपल्या अलौकिक सौंदर्याने लाखो पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असलेल्या कास पठारावर फुलांचा अधिकृत हंगाम सुरू झाला असला, तरी कासची (Kaas Pathar) फुले प्राथमिक अवस्थेतच आहेत.

Kaas Plateau Mahabaleshwar panchgani Tourism

पंधरा सप्टेंबरनंतर फुलं बहरण्यास सुरूवात

मोठ्या प्रमाणावर फुलांचे गालिचे बहरण्यासाठी पंधरा सप्टेंबर नंतरच सुरूवात होईल, असे सद्यस्थितीवरून वाटत आहे.

Kaas Plateau Mahabaleshwar panchgani Tourism

फुलांची चाहूल

पावसाळा सुरू झाला की, कासला फुलांची चाहूल लागते. जून, जुलै महिन्यात येथील जीवसृष्टी बाळसे धरते.

Kaas Plateau Mahabaleshwar panchgani Tourism

हिरवा रंग परिधान

पूर्ण कातळ खडक असलेलं पठार हिरवा रंग परिधान करतं. यातूनच हजारो प्रकारच्या फुलांच्या प्रजाती उगवण्यास सुरूवात होतात.

Kaas Plateau Mahabaleshwar panchgani Tourism

फुले उमलण्यास उशीरा सुरुवात

पंधरा ऑगस्टनंतर फुले उमलण्यास सुरूवात होते. पण, यावर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेली ओढ व काही वर्षांपासून हवामानातील बदल यामुळे फुले उमलण्यास उशीरा सुरुवात होत आहे.

Kaas Plateau Mahabaleshwar panchgani Tourism

मनमोहक गालिचे

त्यामुळे यावर्षी एक सप्टेंबर नंतरच फुलांच्या प्रजाती फुलू लागल्या. सद्यस्थितीत पठारावर चवर (रानहळद) मोठ्या प्रमाणात बहरली असून या फुलाचे पांढरेशुभ्र गालिचे मनमोहक दिसत आहेत.

Kaas Plateau Mahabaleshwar panchgani Tourism

विविधरंगी फुलांचा साज

चवरनंतर पठाराला मोठ्या प्रमाणात आच्छादित करतात ते लाल, गुलाबी तेरडा, पांढरे गेंद व निळी सीतेची आसवे ही फुले. तेरड्याने दर्शन द्यायला सुरुवात केली असून पांढरे गेंद व निळी सितेची आसवे ही काही प्रमाणात उमलू लागली आहेत. या तीन फुलांची लाल, निळी, पांढरी छटा पठाराला खरा साज देत आहे. (फोटो : सूर्यकांत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kaas Plateau Mahabaleshwar panchgani Tourism