तरूण दिसण्यासाठी करा हे घरगुती उपाय

नमिता धुरी

अंड्याचा पांढरा द्राव एक चमचा आणि लिंबाचा रस एक चमचा यांचे मिश्रण करून चेहऱ्याला १५ मिनिटे लावा.

एक चमचा दही आणि अर्धा चमचा बेसन यांच्या मिश्रणाने चेहऱ्यावर १० मिनिटे मालीश करा.

१ चमचा मध आणि १ चमचा गव्हाचे पीठ चेहऱ्याला १० मिनिटे लावून ठेवा.

काकडीचा रस आणि गुलाब पाणी चेहऱ्यावर लावून रात्रभर झोपू शकता.

छोटा चमचा अॅलोवेरा जेलमध्ये ५ थेंब लिंबाचा रस मिसळून आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावा.

एक मोठा चमचा तांदळाचे पाणी आणि अर्धा छोटा चमचा गुलाब पाणी यांचे मिश्रण १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा.

अर्धा छोटा चमचा खोबरेल तेल, ५ थेंब बदामाचे तेल आणि ५ थेंब लिंबाचा रस यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावा.

व्हिटामिन ई तेलामध्ये गुलाब पाणी मिसळून झोपण्यापूर्वी काही वेळ चेहऱ्याला लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.