पावसाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट होतेय? मग या टिप्स फॉलो करा

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात. पावसाळा आनंद घेऊन येणारा ऋतू असला तरी तो आरोग्यासंबंधीत अनेक समस्या देखील येऊ येतो.

पावसाळ्यात विशेषत: त्वचेसंबंधीत अनेक समस्या निर्माण होतात, त्यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते.

यात तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींना पावसाळ्यात अधिक जपावे लागते. नाहीतर त्वचेवर पुरळ, खाज सुटू लागते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तेलकट त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

एलोवेरा जेल

प्रथम आपला चेहरा स्वच्छ करा. यानंतर एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून 3 ते 4 दिवस हा उपाय करा.

मुलतानी माती

तेलकट त्वचेची समस्या मुलतानी मातीच्या मदतीने दूर केली जाऊ शकते. मुलतानी मातीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि हे सर्व गुणधर्म त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करतात.

एका भांड्यात मुलतानी माती घ्या. त्यात गुलाबपाणी टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 दिवस करा.

बेसन

एका भांड्यात एक चमचा बेसन घ्या. बेसनाच्या पिठात थोडे दही मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी चेहरा धुवा. हा उपाय आठवड्यातून दोन दिवस करा.