Suhana Khan: सुहानाच्या भावी पार्टनरसाठी शाहरुखने ठेवल्या आहेत 'या' सात अटी

सकाळ डिजिटल टीम

सुहाना खान

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.

स्टायलिश अंदाजाची चर्चा

तिचे लुक्स, तिचा स्टायलिश अंदाज सगळ्यांनाच भावतो. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होतात.

शाहरुखची लाडकी

पण तुम्हाला माहितीये का? तिन्ही मुलांमध्ये सुहाना शाहरुखची सगळ्यात जास्त लाडकी आहे.

शाहरुखने ठेवल्या आहेत खास अटी

सुहानाला डेट करणाऱ्या मुलासाठी आणि तिच्या भावी नवऱ्यासाठी शाहरुखने सात अटी ठेवल्या आहेत. त्यातील पहिली आहे त्याने चांगलं नोकरी किंवा बिझनेस करायला हवा.

दुसरी अट

सुहानाला डेट करायचं असेल तर त्या मुलाला हे कायम लक्षात ठेवावं लागेल कि शाहरुखला तो कधीच आवडणार नाही आणि त्याने त्याची सवय करून घ्यावी.

तिसरी अट

'मी सगळीकडे आहे' म्हणजेच शाहरुखची नजर तिच्या बॉयफ्रेंडवर कायम असेल.

चौथी अट

'स्वतःसाठी एक वकील शोध' म्हणजेच कधीही भांडण झालं तर तिच्या बॉयफ्रेंडला थेट वकिलाची गरज पडू शकते.

पाचवी अट

'ती माझी राजकुमारी आहे तू जिंकलेली ट्रॉफी नाही. ' म्हणजे जर सुहानाला डेट करायचंय तर तिच्याशी नीट वागावं लागेल आणि तिला एखाद्या राजकुमारीप्रमाणे सांभाळावं लागेल.

सहावी अट

'मला जेलमध्ये जावं लागलं तरीही हरकत नाही' म्हणजे जर तिचा बॉयफ्रेंड चुकीचा वागला तर शाहरुख कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्याची जेलमध्ये जायचीही तयारी आहे.

सातवी अट

'तू तिच्याशी जसं वागशील तशीच वागणूक तुला माझ्याकडून मिळेल.' म्हणजेच शाहरुखने सुहानाच्या भावी बॉयफ्रेंडला धमकीवजा इशाराच दिलाय कि तू तिच्याशी नीट वाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranbir Kapoor | Esakal
येथे क्लिक करा