Aishwarya Musale
प्रदूषण, अनहेल्दी आहार, बिघडलेली जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेचा ग्लो कमी होऊ लागतो.
या सगळ्याशिवाय हिवाळ्याची कोरडी हवा आपली त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव बनवते. त्यामुळे आपण आपल्या त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्वचेच्या काळजीमध्ये आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
काही खाद्यपदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्याने तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो येऊ शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या खाद्यपदार्थांमुळे तुमची त्वचा ग्लोईंग होऊ शकते.
बीट तुमचे गाल नैसर्गिकरित्या गुलाबी बनवू शकते आणि तुमची त्वचा सुधारू शकते. बीटमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात.
बदामामध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ई बदामामध्ये आढळते, जे सुरकुत्या आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते.
बेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, जे त्वचेला तेजस्वी बनवण्यासाठी फायदेशीर असतात. ते कोलेजन तयार करण्यास देखील मदत करतात, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारख्या वृद्धत्वाच्या समस्या कमी होतात.
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जे नवीन पेशी तयार करण्यासाठी आणि जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी आवश्यक आहे. हे कोलेजन तयार करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे वृद्धत्वाची समस्या कमी होते आणि त्वचा चमकते.
संत्री, लिंबू इत्यादी लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. Vitamin-C त्वचेचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून संरक्षण करते. याव्यतिरिक्त, अँटी-ऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे, ते आपली त्वचा उजळ करण्यास मदत करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.