प्रजासत्ताक दिनानिमित्त करा 'या' खास तिरंगा रेसिपी

Aishwarya Musale

देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे.

जर प्रजासत्ताक दिनानिमित्त काहीतरी खास बनवण्याचा विचार करत असाल तर दिलेल्या रेसिपी ट्राय करु शकता. तीन रंगात रंगलेल्या रंगीत स्पेशल रेसिपींबद्दल जाणून घ्या.

डेजर्ट

प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही डेजर्टला ट्राय कलरही देऊ शकता. यासाठी केशरी, पांढरा आणि हिरवा अशा वेगवेगळ्या रंगांचे आइस्क्रीम किंवा क्रीम मिसळून तुम्ही तिरंगा बनवू शकता.

सॅलड

अशा प्रकारे तुम्ही फळे आणि सॅलड वेगवेगळ्या रंगात कापून तिरंग्याच्या रंगात सजवू शकता.

सँडविच

तिरंगा सँडविच सर्वांनाच आवडणारी डिश आहे.

ढोकळा

तसेच तुम्ही ढोकळा तिरंग्याच्या रंगात रंगवू शकता. ते इतके आकर्षक दिसेल की लहान मुले देखील ते खातील.

ट्राय कलर स्मूदी

प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही ट्राय कलर स्मूदीही बनवू शकता. केळी, पपई, किवी आणि दूध एकत्र करून तुम्ही ही स्मूदी तयार करू शकता.

पुलाव किंवा बिर्याणी

पुलाव किंवा बिर्याणी सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही ट्रायकलर बिर्याणी आणि पुलाव बनवू शकता.यात अनेक हिरव्या पालेभाज्या , गाजर याने तिरंगा रंग दिसू शकतो.

पास्ता

प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात तुमच्या पास्त्याला तिरंगा रंग द्या. गाजर, ब्रोकोली आणि पांढरा पास्ता यासारख्या भाज्या वापरून तुम्ही तुमचा तिरंगा स्नॅक पटकन तयार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.