धनश्री भावसार-बगाडे
उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे थंडावा मिळतो. कॅल्शियम, फॉस्फरसची कमतरता भरून निघते
पण दही खाताना काही नियम पाळणे आवश्यक असते. दही आपला कफ दोष वाढवू शकतो.
रात्री दही खाताना त्यात मीरे पूड आणि मेथीदाणा पूड घालून घावे. त्यामुळे कफाचा त्रास होणार नाही.
आयुर्वेदानुसार दही गरम केल्याने त्यातले सत्व बदलू शकतात. त्यामुळे अंगावर सूज येऊ शकते.
आयुर्वेद तज्ज्ञ म्हणतात, रोज दही खाल्ल्याने जळजळ वाढू शकते. त्यामुळे रोज दही खाण्याऐवजी ताक पिणे आरोग्यासाठी चांगले असते.
दह्यासोबत कोणतंही फळ खाणं यामुळे अॅलर्जी वाढू शकते व पचन क्रिया बिघडू शकते.
बऱ्याचदा मासे, किंवा मांसाहारी पदार्थ दह्यात मॅरीनेट केले जातात. पण मासे व मांस कधीही दह्यासोबत खाऊ नये. यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.
बऱ्याच लोकांना बुंदी रायता किंवा मठ्यात बुंदी टाकून खायला आवडते. तळलेली बुंदी दह्यात टाकून खाणे हे विषारी ठरू शकते.
दही टाकून केलेली कोशिंबीर ही शरीरासाठी विषारी ठरू शकते. आयुर्वेदानुसार दही आणि काकडीचे गुणधर्म परस्पर विरुद्ध आहेत.
काकडी कोशिंबीरीवर दूधी भोपळ्याचा रायता हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.