Monika Lonkar –Kumbhar
सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत.
या समस्यांमध्ये नैराश्य, चिंता इत्यादी मानसिक समस्यांचाही समावेश आहे.
परंतु, मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही आहाराची देखील मदत घेऊ शकता. त्यासाठी आहारात काय समाविष्ट करायच? चला तर मग जाणून घेऊयात.
ओट्समुळे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते आणि चिंताग्रस्त लक्षणे कमी होण्यास मदत होते.
केळीमध्ये मॅग्नेशिअमचे भरपूर प्रमाण आढळते. जे आपल्या शरीरातील स्नायूंना आराम देण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते.
बेरीजचे सेवन केल्याने मूड सुधारण्यास मदत होते.
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे मूड सुधारतात आणि चिंता-तणाव कमी करतात.