रोहित कणसे
आज गटारी अमवस्या असल्याने अनेक लोक आज ठरवून मांसाहार करतात, मांसाहार म्हणजे ते सर्व लोक जे चिकन, मांस, मासे किंवा इतर मांस खातातआरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.
पण तुम्हाला माहित आहे का की दुधाव्यतिरिक्त असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे मांसाहारानंतर खाऊ नयेत.
मासांहार केल्यानंतर नेमके कोणते पदार्थ खावू नयेत हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
तुम्ही नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दूध अजिबात पिऊ नये. दूध आणि मांसाहार हे मिश्रण आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.
दुधाप्रमाणेच दही देखील दुग्धजन्य पदार्थ आहे, त्यामुळे मांसाहारानंतर ते देखील टाळावे. मांसाहारानंतर लगेच दही खाल्ल्यास त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. मांसाहार आणि दही यांचे मिश्रण पचनसंस्थेवर वाईट परिणाम करू शकते.
आपल्यापैकी अनेकांना जेवण झाल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते, मात्र अन्न खाल्ल्यानंतर चहा प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. खासकरून मांसाहार खाल्ल्यानंतर चहा पिऊ नये.
मांसाहारी म्हणजे मासे, चिकन किंवा मांस खाल्ल्यानंतर फळे खाऊ नये, मांसाहारानंतर फळे खाल्ल्याने शरीराला अनेक समस्या निर्माण होतात. त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
मांस किंवा मटण खाल्ल्यानंतर मधाचे सेवन करू नये, हे तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते.
नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ज्यूस घेणेही टाळावे. कारण बहुतेक रस थंड असतात आणि चिकन आणि मांस गरम असतात. हे चुकीचे संयोजन असू शकते. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर २-३ तास ज्यूस पिऊ नये
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
तजेलदार त्वचेसाठी घरीच बनवा पपई-कोरफडचा फेसपॅक