Pranali Kodre
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सी जगातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. २४ जून रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या मेस्सीने त्याच्या कारकिर्दित जवळपास सर्व यशाची शिखरे पार केली आहेत.
मेस्सीने त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळ बार्सिलोना क्लबकडून खेळताना घालवला. या संघासाठी त्याने वयाच्या १७ व्या वर्षीच २००७ मध्ये पदार्पण केले होते. तो इस्पायनोलविरुद्ध सब्स्टिट्युट म्हणून खेळला होता.
त्यानंतर २००५ साली त्याने अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. त्याने पहिला आंतरराष्ट्रीय सामना हंगेरीविरुद्ध खेळला होता.
साल २००८ मध्ये बिजिंगला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मेस्सीने अर्जेंटिनाकडून खेळताना सुवर्णपदक जिंकले होते. अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात नायजेरियाला पराभूत केले होते.
मेस्सीने २००९ मध्ये पहिल्यांदा चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली होती.
मेस्सीने २०२१ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलला पराभूत केले होते. हे मेस्सीचे अर्जेटिंनाकडून जिंकलेले पहिले मोठे विजेतेपद ठरले होते.
जवळपास २ दशकांची मेस्सीची वर्ल्ड कप जिंकण्याची प्रतिक्षा २०२२ मध्ये संपली. अर्जेंटिनाने रोमांचक अंतिम सामन्यात फ्रान्सला पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभूत केले होते.
मेस्सीने विक्रमी ८ वेळा मानाचा बॅनल डी'ओर पुरस्कार जिंकला आहे.
मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत १०६५ सामन्यांत ३७४ असिस्ट केले असून ८३७ गोल्स केले आहेत.