Anuradha Vipat
रविना टंडनने एका मुलाखतीमध्ये करिअरच्या सुरुवातीच्या काळाविषयी सांगितले आहे .
रविना टंडन वयाच्या २१व्या वर्षी आई झाली होती.
पण रविना टंडनने दहा वर्षे ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती.
चित्रपटांमध्ये यश मिळाल्यानंतर रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतले होते.
त्या दोन मुली म्हणजे छाया टंडन आणि पूजा टंडन. त्यावेळेस पूजा ११ वर्षांची तर छाया ८ वर्षांची होती.
दोन्ही मुलींची दहावी पूर्ण होईपर्यंत रवीनाने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती.
त्यानंतर मात्र रविना दोघींनाही चित्रपटाच्या सेटवर नेऊ लागली.त्यानंतर रविनाने सगळ्यांना तिच्या मुलींची ओळख करून दिली.