नीरज चोप्राची परदेशातही क्रेझ! Selfi साठी तरुणींची गर्दी Video Viral

Pranali Kodre

नीरज चोप्रा

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने त्याच्या कारकि‍र्दीत मोठे यश मिळवले आहे.

Neeraj Chopra | Paris Olympic 2024 | Sakal

मोठा चाहतावर्ग

नीरजने जवळपास सर्वच स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्याचा भारतातच नाही, तर जगभरातही एक मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. याचाच प्रत्येय नुकताच आला.

Neeraj Chopra | Sakal

डायमंड लीग फायनल

नीरज नुकताच बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये डायमंड लीग फायनलमध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेत केवळ एका सेंटीमीटरच्या फरकामुळे त्याला दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले.

Neeraj Chopra | Paris Olympic 2024 | Sakal

चाहत्यांची गर्दी

या स्पर्धा खेळल्यानंतर तो जेव्हा परत जायला निघाला तेव्हा बॅरिकेट्सजवळ त्याचे अनेक चाहते उभे असलेले दिसून आले.

Neeraj Chopra | Sakal

तरुणींनीही फोन नंबरही मागितला

त्यामुळे नीरज त्यांना भेटायला थांबला आणि त्याने अनेकांना ऑटोग्राफही दिला. याचदरम्यान, दोन परदेशी तरुणींनीनाही नीरजबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. इतकंच नाही, त्यातील एकीने त्याचा फोन नंबरही विचारला.

Neeraj Chopra wjth Female Fan | Sakal

परदेशातही क्रेझ

नीरजची परदेशातही असलेली क्रेझ दाखवणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ऑलिम्पिक रौप्य पदक

दरम्यान, नीरजने ऑगस्टमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकही जिंकले होते. त्यानंतर तो डायमंड लीगमध्ये सहभागी झाला होता.

Neeraj Chopra | Sakal

फ्रॅक्चर असतानाही खेळला

विशेष म्हणजे नीरजच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर असतानाही त्याने डायमंड लीग फायनल स्पर्धा खेळली.

Neeraj Chopra | Sakal

पाकिस्तानमध्येही Virat Kohli ची क्रेझ, स्टेडियममध्येच फडकावली जर्सी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli | Team India | T20 World Cup | X/ICC
येथे क्लिक करा