Aishwarya Musale
हवामान कोणतेही असो, आपण नेहमीच स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा अनेक आजार होण्याचा धोका असू शकतो. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण काही थंड द्रवपदार्थ नक्कीच पितो.
पण तुम्हाला माहित आहे का की काही ड्रिंक्सचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL चे प्रमाण कमी होते.
उन्हाळ्यात टोमॅटो खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे लाइकोपीन नावाचे अँटिऑक्सिडंटचे समृद्ध स्त्रोत आहे.
जे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. यामध्ये असलेले फायबर उच्च कोलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळे टोमॅटोचा रस नियमित प्या.
सोया मिल्क हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्याची क्षमता असते. दैनंदिन आहारात त्याचा समावेश करणे आवश्यक आहे.
नाश्त्यात ओट्सचे मिल्क प्या, ते उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. ओट्समध्ये बीटा-ग्लुकेन्स भरपूर प्रमाणात असतात जे आतड्यात जेलसारखे पदार्थ तयार करतात.
हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही ओट्सचे पॅकेज्ड केलेले ड्रिंक पीत असाल तर त्यामध्ये बीटा-ग्लुकन्स आहे की नाही याची खात्री करून घ्या.
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि एपिगॅलोकेटचिन गॅलेट आढळतात आणि ते अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे दिवसातून दोनदा प्यावे कारण असे केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.