इमॅन्युएल मॅक्रॉन अन् पंतप्रधान मोदींनी केली 'चाय पे चर्चा'; 'UPI' वापरून केलं पेमेंट

अंकिता खाणे (Ankita Khane)

आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन काल भारत दौऱ्यावर आले आहेत.

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल गुरुवारी (25 जानेवारी 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली .

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

राजस्थानची राजधानी जयपूर येथील हॉटेल 'ताज रामबाग पॅलेस'मध्ये ही बैठक द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात आल्याचे समजते.

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

दोन्ही नेत्यांनी एकत्र रोड शो केला

आदल्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांनी जंतरमंतर ते परकोट येथील संगनेरी गेटपर्यंत रोड शो केला होता आणि त्यादरम्यान मोठ्या संख्येने लोक जमले होते.

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

दोन्ही नेते नंतर स्थानिक कलाकृती आणि हस्तकला उत्पादने विकणाऱ्या दुकानात गेले.

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराची प्रतिकृती भेट दिली .

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात चर्चेदरम्यान संरक्षण-सुरक्षा, व्यापार, हवामान बदल आणि अणुऊर्जा यासह इतर क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली.

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, दोन्ही देशांदरम्यान तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि संरक्षण सहकार्याबाबत विशेष चर्चा झाली.

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

त्याचबरोबर दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेत योगदान देण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याचे आश्वासनही दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांनी जयपूरचा प्रसिद्ध चहा देखील सोबत घेतला, ज्याचे पैसे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी UPI द्वारे दिले.

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

त्याचवेळी पीएम मोदींनी यूपीआय पेमेंट करून राम मंदिराचे मॉडेल विकत घेतले, जे त्यांनी मॅक्रॉन यांना भेट म्हणून दिले.

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

यादरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी पीएम मोदींनी केलेल्या यूपीआय पेमेंटची प्रक्रियाही समजून घेतली.

Prime Minister narendra modi and French President Emmanuel Macron | Esakal

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breast Size
येथे क्लिक करा