Sudesh
आजच्या टेक्नॉलॉजी आणि एआयच्या युगात कम्प्युटर येणं ही अगदीच गरजेची बाब झाली आहे. जवळपास सर्वच नोकऱ्यांमध्ये सध्या कम्प्युटर आवश्यक झाला आहे.
तुम्हाला कम्प्युटरसोबतच कामासाठी आवश्यक असणारे विशेष कोर्सेसही करणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
कम्प्युटर कोर्सेसची फी भरपूर असते. मात्र, आम्ही तुम्हाला काही मोफत ऑनलाईन कम्प्युटर कोर्सेसची माहिती देणार आहोत.
स्वयम पोर्टलवर उपलब्ध असणारा हा कोर्स 12 आठवड्यांचा आहे. यामध्ये तुम्हाला कम्प्युटर मेमरी, सीपीयू, ड्रायव्हर्स, इंटरनेट, मल्टिमीडिया, ऑपरेटिंग सिस्टीम आणि इतर माहिती मिळते.
रास्पबेरी पाय फाउंडेशनचा हा कोर्स फ्युचरलर्न प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. चार आठवड्यांचा हा कोर्स बायनरी लॉजिक, कम्प्युटर आर्किटेक्चर आणि अशाच इतर गोष्टींची माहिती देतो.
बिझनेसमध्ये कम्प्युटरचा कसा वापर करायचा याबाबतचा IGNOUचा कोर्स स्वयम पोर्टलवर उपलब्ध आहे. 12 आठवड्यांच्या या कोर्समध्ये तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक ज्ञान, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि इतर गोष्टींबाबात माहिती मिळते.
STP कम्प्युटर एज्युकेशन याठिकाणी उपलब्ध असणारा हा तीन महिन्यांचा कोर्स तुम्हाला कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान देईल. यामध्ये ईमेल पाठवणे, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे अशा कित्येक गोष्टी शिकवण्यात येतील.
जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाचा हा कोर्स कोर्सेरा वेबसाईठवर मोफत उपलब्ध आहे. एखादे सॉफ्टवेअर कसे तयार करायचे, स्वतःची ओएस कशी तयार करायची आणि व्हर्चुअल मशीन कशा डीप्लॉय करायच्या अशा गोष्टींची माहिती या कोर्समधून मिळेल. हा कोर्स 7 आठवड्यांचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.