साक्षी राऊत
बॉलीवुडचे कलाकार ऑनस्क्रीन विविध कलाकारांसोबत काम करतात, पण खऱ्या आयुष्यात त्यांचे काही जीवलग मित्र आहेत.
या कलाकारांची यारी आजची नसून अगदी त्यांच्या बॉलीवुडमधील सुरुवातीच्या दिवसांपासून ती त्यांनी जपली आहे. चला तर हे कलाकार कोणते ते जाणून घेऊया.
शाहरूख आणि जुही चावला यांची मैत्री फार जुनी आहे. पण मैत्री अजूनही तशीच आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांतदेखील सोबत काम केले आहे.
करीना आणि अम्रिता या दोघी बेस्ट फ्रेंड्स आहेत. यांच्या मैत्रीची बॉलीवुमध्ये देखील जोरदार चर्चा असून दोघी त्यांचे सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
रणवीर आणि अर्जून हेसुद्धा सोशल मीडियावर बरेच चर्चेत असतात. त्यांनी त्यांच्या जोडीचं नाव बाबा असं ठेवलं आहे.
मौनी आणि दिशा यासुद्धा बेस्ट फ्रेंड्स आहेत. त्या अनेक ठिकाणी सोबत स्पॉट केल्या जातात. सोशल मीडियावरसुद्धा यांच्या एकत्र काढलेल्या फोटोंची बरीच चर्चा रंगते.
या तिघी मैत्रिणी कायम सोबत असतात. या तिघी बालपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत. बऱ्याच पार्टीजमध्येसुद्धा त्या सोबत दिसतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.