सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूडमध्ये रुपेरी पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारत सगळ्यांना घाबरवणारा सोनू सूद मात्र खऱ्या आयुष्यात गरिबांचा मसीहा म्हणून ओळखला जातो.
गरजुंना मदत करणाऱ्या सोनूची लव्हस्टोरीसुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे. सोनूची पत्नी सोनाली लाइमलाईटपासून दूर राहते. या दोघांची ओळख इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये झाली.
नागपूरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे दोघं भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. अगदी लव्ह अट फर्स्ट साईट प्रमाणे सोनू सोनालीच्या प्रेमात पडला आणि त्यांनी डेट करायला सुरुवात केली.
सोनू २१ वर्षांचा असताना २५ सप्टेंबर १९९६ ला या दोघांनी लग्न केलं. त्यावेळी सोनुने अभिनयक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला नव्हता. पण तीन वर्षांनी त्याने तो निर्णय सोनालीला बोलून दाखवला आणि तिने त्याला पाठिंबा दिला.
सोनालीने त्याची कठीण प्रसंगी साथ दिली. त्याच्याबरोबर मुंबईत आल्यावर तिने केले छोट्या खोलीत संसार केला. १९९९ मध्ये साऊथ इंडियन आणि २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये सोनुने अभिनेता म्हणून पदार्पण केलं.
सोनू आणि सोनालीला अयान आणि ईशांत ही दोन मुले आहेत.
सोनाली ही निर्माती असून तिने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुतक तुतक तुतिया’ या सिनेमाची सहनिर्मिती केली होती.