kimaya narayan
कलर्स हिंदी वरील बहुप्रतीक्षित बिग बॉस सीजन 18 ची घोषणा झाली आहे. बिग बॉस सीजन 18 मध्ये कोणते सेलिब्रिटींक स्पर्धक म्हणून सहभागी होणार जाणून घेऊया.
अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येमुळे वादात अडकलेला अभिनेता शिजान खान बिग बॉसच्या अठराव्या पर्वात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
ये है मोहोब्बत्तें मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका रमणही म्हणजेच अभिनेता करण पटेल यंदाच्या सीजनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
भन्नाट अभिनयामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी ज्योतीचंही नावही बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत समाविष्ट आहे.
सोशल मीडिया सेन्सेशन असलेला डॉली चायवाला बिग बॉस 18मध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जातंय. त्याचे सोशल मीडियावरील रील्स चर्चेत असतात.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झैन सैफही बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणार आहे.
सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि माजी टीएमसी खासदार नुसरत जहाँ बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणार आहे.
सध्या दुसऱ्या नवऱ्याशी असलेल्या भांडणामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री दलजित कौर बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणार आहे. या आधी ती बिग बॉस सीजन 13 मध्ये सहभागी झाली होती.
बॉलिवूडची माजी अभिनेत्री आणि सध्या सोशल मीडिया स्टार असलेली समीरा रेड्डीही बिग बॉसच्या नव्या पर्वात सहभागी होणार आहे.
बिग बॉसची माजी विजेती दीपिका कक्करचा नवरा आणि अभिनेता शोएब इब्राहिम हा पहिला बिग बॉस 18 चा कन्फर्म स्पर्धक ठरला आहे. या आधीही त्याच्या या शोमध्ये सहभागी झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या.