सुहाना ते ख़ुशी ; दिवाळी पार्टीसाठी बॉलिवूडच्या जेन-झी पिढीचे लक्षवेधी लूक

kimaya narayan

सुहाना खान

अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान तिच्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. यंदाच्या दिवाळी पार्टीला सुहानाच्या मोहक लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मॉडर्न टच असलेली पारंपरिक साडी सुहानाने यंदा दिवाळी पार्टीला नेसली होती. या साडीवर तिने कॉर्सेट ब्लाउज घातला होता. तिचा हा लूक अनेकांना पसंत पडला.

ख़ुशी कपूर

सुहानाप्रमाणेच ख़ुशी कपूरनेही दिवाळी पार्टीला साडी नेसून जाणं पसंत केलं. सुहानाने पेस्टल रंगाची सिक्वेन्स आणि एम्ब्रॉयडरी वर्क असलेली साडी नेसली होती. सोशल मीडियावर अनेकांना तिचा हा लूक पसंत पडला.

शनाया कपूर

बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री शनाया कपूरच्या भन्नाट लूकने सगळ्यांचं लक्ष वेधू घेतलं. शनायाने पांढऱ्या रंगाची मोती जडवलेली साडी नेसली होती. तिचा हा फ्युजन लूक इंटरनेटवर व्हायरल होतोय.

अलिझे अग्निहोत्री

सलमान खानची अभिनेत्री अलिझे अग्निहोत्रीने सुंदर शिमरी साडीमध्ये दिवाळी पार्टीला हजेरी लावली. तिचा लूक अनेकांना पसंत पडला.

अनन्या पांडे

सगळ्या अभिनेत्री साडी नेसून दिवाळी पार्टीला हजेरी लावत असताना अभिनेत्री अनन्या पांडेने मेटॅलिक लेहंगा चोलीमध्ये हजेरी लावत पार्टीला चारचाँद लावले.

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरने मल्टीकलर सिक्वेन्स साडी नेसत सगळ्यांना घायाळ केलं.

बॉलिवूड क्वीन

आता या जेन झी मधील कोणती अभिनेत्री बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नेटफ्लिक्सवर पाहा हे सस्पेन्स सिनेमे - येथे क्लिक करा