Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
संतुलित आहार घेतल्याने आपल्या शरीराचे योग्य पोषण होते.
शरीराची आपण योग्य काळजी घेतो पण मेंदूच्या आरोग्याकडे आपण काहीसे दुर्लक्ष करतो.
निरोगी अन् अॅक्टिव्ह मेंदूसाठी आहारात काही फळांच्या ज्यूसचा समावेश करायला हवा. कोणते आहेत ते ज्यूस? चला जाणून घेऊयात.
डाळिंबामध्ये पॉलिफेनॉल मोठ्या प्रमाणात असतात. हे पॉलिफेनॉल्स मेंदूचे आरोग्य सुधारतात.
ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन पॉलिफेनॉल आढळते. या पोषकतत्वामुळे मेंदूची स्मरणशक्ती सुधारण्यास आणि पोषण होण्यास मदत होते.
काही संशोधनानुसार, बीटामध्ये आढळून येणाऱ्या नायट्रेटमुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि मेंदू सक्रिय राहण्यास मदत होते.