यंदाच्या गणेश चतुर्थीला ‘या’ प्रसिद्ध गणपती मंदिरांना नक्की भेट द्या...

Aishwarya Musale

गणपतीची मूर्ती

गणेश चतुर्थीच्या सणाला काही दिवस उरले आहेत. गणेश चतुर्थीचा सण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणतात आणि बाप्पाची पूजा केली जाते.

गणेश चतुर्थी

यंदा गणेश चतुर्थी हा सण 19 सप्टेंबर 2023 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत साजरा केला जाणार आहे. आज आम्ही तुम्हाला भारतभरात असलेल्या गणेशाच्या काही प्रसिद्ध मंदिरांबद्दल सांगणार आहोत, जिथे भेट दिल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

सिद्धिविनायक मंदिर

मुंबई- सिद्धिविनायक मंदिर हे गणेशाच्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची स्थापना १८०१ साली मुंबईत झाली. या मंदिरातील गणपतीला नवसाचा गणपती म्हणूनही ओळखले जाते.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

पुणे- दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे महाराष्ट्र येथे स्थित गणेशाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथे 7.5 फूट उंच गणेशाची मूर्ती आहे.

गणेश टोंक मंदिर

गणेश टोंक मंदिर सिक्कीममधील गंगटोक-नाथुला रोडपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर सुमारे 6,500 फूट उंच टेकडीवर बांधले आहे.

उची पिल्लयार मंदिर

तिरुचिरापल्ली - भगवान गणेशाचे हे मंदिर तामिळनाडूचे प्रसिद्ध उची पिल्लयार मंदिर आहे, जे तिरुचिरापल्ली येथील त्रिची नावाच्या ठिकाणी रॉक फोर्ट टेकडीच्या शिखरावर वसलेले एक अतिशय सुंदर मंदिर आहे.

मोती डुंगरी गणेश मंदिर

जयपूर- हे मंदिर मोती डुंगरी, जयपूर येथे आहे. असे म्हटले जाते की येथे स्थापित केलेली मूर्ती गुजरातमधील मावळी येथून आणली गेली होती, जे जयपूरचा राजा माधो सिंग पहिला हिचे माहेर आहे.

कनिपक्कम विनायक मंदिर

कनिपक्कम विनायकाचे हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. नदीच्या मधोमध हे बांधण्यात आले असून, येथे गणेशमूर्तीचा आकार सतत वाढत असल्याचे सांगितले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.