लाडक्या बाप्पासाठी बनवा पुरणाचे मोदक, पाहा सोपी रेसिपी

Aishwarya Musale

गणेशोत्सव

गणेशोत्सवात मोदकांना विशेष महत्त्व आहे. नारळ-गुळाच्या मोदकांचा नैवेद्य तसा सर्वांनाच परिचित आहे. आज आम्ही तुम्हाला पुरणाचे मोदक कसे बनवायचे सांगणार आहोत.

purnache modak | sakal

लागणारे साहित्य

१/२ कप किसलेले खोबरे, १ कप चणाडाळ, १ कप गुळ, १ चिमूट मीठ, १/४ टीस्पून जायफळ पूड, तळणीसाठी तेल, १ चमचा तूप.

purnache modak | sakal

तांदळाचे पीठ

१ कप गव्हाचे पीठ, १/४ कप तांदळाचे पीठ लाटण्यासाठी, १/४ टीस्पून मीठ, १ टीस्पून तूप

purnache modak | sakal

चणाडाळ

चणाडाळ स्वच्छ धुवून ४ वाट्या पाणी घालून कुकरमध्ये ३ शिट्ट्या काढून शिजवून घ्यावी. एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करावे. त्यात किसलेले खोबरे घालून परतून घ्यावे. कुकर थंड झाल्यावर शिजलेली डाळ लगेचच चाळणीवर ओतावी व त्यातील पूर्ण पाणी काढावे.

purnache modak | sakal

गुळ

दुसऱ्या पॅनमध्ये पाणी निथळलेली डाळ घ्यावी. त्यात गुळ, मीठ घालून पुरण शिजवून घ्यावे. मिश्रण थोडे सुकत आल्यावर त्यात सारण, वेलची, जायफळ पूड घालून पुरण पूर्ण सुकवून घ्यावे. पुरण थंड करत ठेवावे.

purnache modak | sakal

तुप

गव्हाच्या पीठात एक चमचा तांदळाचे पीठ व मीठ मिक्स करावे.तूप चांगले गरम करावे व पिठात घालावे. हे तुपाचे मोहन पीठात छान हाताने चोळून एकजीव करावे.

purnache modak | sakal

पोळी

हे मळलेले पीठ एक तासासाठी झाकून ठेवावे. १ तासानंतर पीठ पुन्हा छान मळून घ्यावे व त्याचे एकसारखे गोळे करावेत. पोळीप्रमाणे लाटून छोट्या लाट्या करून घ्याव्यात.

purnache modak | sakal

पुरण

थंड झालेलं पुरण प्रत्येक लाटीत मधोमध घालून त्याच्या छान कळ्या पाडाव्यात. गॅसवर मध्यम आचेवर तेल गरम करावे व सर्व मोदक छान दोन्ही बाजूंनी तळून घ्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

purnache modak | sakal