Monika Lonkar –Kumbhar
६४ कलांचा अधिपती आणि भक्तांचे संकट दूर करणारा विघ्नहर्ता अशी गणपती बाप्पांची महती आहे.
सर्वांना प्रिय असणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन ७ सप्टेंबर (शनिवारी) होणार आहे.
हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते.
यंदा ही तिथी ७ सप्टेंबर २०२४ ला असणार आहे. तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असणार आहे.
पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा २ तास ३१ मिनिटांचा असणार आहे. परंतु हा संपूर्ण दिवस चांगला असल्याने तुम्ही गणेशमूर्तीची स्थापना दिवसभरात कधीही करू शकता.
गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी सकाळी ११ वाजून ३ मिनिटांपासून ते १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असेल.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पांची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवा.