पुजा बोनकिले
देशभरात गणेशोत्सव ढोल ताश्यांच्या गजरात मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा केला जातो.
यंदा ७ सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
गणपती बाप्पाची मूर्ती घरी कशी आणावी हे जाणून घेऊया.
बाप्पांची मूर्ती वाघ, उंदीर, हत्ती, मोर, गरुड इत्यादी प्राण्यांवर व पक्ष्यांवर बसलेली नसावी.
उभी असलेली, नृत्य करणारी, एक पाय खाली सोडलेली, कोणत्याही राक्षसाचा वध करण्याच्या मुद्रेतील नसावी.
फायबर, प्लॅस्टिक, कडधान्यांपासून बनवलेल्या गणपती मूर्तीचे पूजन करु नये.
एक वितेपेक्षा मोठी मूर्ती नसावी.
गणपती बाप्पांची मूर्ती डाव्या सोंडेची, पद्मासन घातलेली, उजव्या हातात परशू, तर दुसरा हात ‘वर’ देणारा, एका डाव्या हातात पाशांकुश व दुसऱ्या हातात मोदक असलेली घरी आणावी.