पुजा बोनकिले
यंदा गणेशोत्सव ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे.
गणपती हा विघ्नहर्ता आहे. त्यामुळे तो प्रसन्न राहिला तर आपल्या कार्यात, जीवनात कोणतेही विघ्न येत नाही.
यासाठी गणपतीला ज्या ज्या वस्तू आवडतात त्या अर्पण करून प्रसन्न केले जाते.
यामध्ये दूर्वा, लाल फुले, मोदक, लाडू याबरोबरच गणेशाची स्तुतीही केली जाते.
ती स्तुती म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. अनेक ठिकाणी याची हजार आवर्तनेही केली जातात. याला सहस्रावर्तने म्हणतात.
गणपती अथर्वशीर्षाचे सामुदायिक पठण केल्याचे खूप लाभ आहेत.
यावेळी उत्पन्न होणारी कंपने आत्मा आणि हृदय शुद्ध करतात.
विचार उन्नत करतात आणि अपार मन:शांतीची अनुभूती देतात, असे सुमंत अयाचित यांनी सांगितले.