पुजा बोनकिले
गणेशमूर्ती आणताना ताम्हण आणि रूमाल घेऊन जावे.
गणपती बाप्पांना झाकून आणावे आणि गणेशाचे तोंड आपल्याकडे करावी.
घराच्या दाराबाहेरच तांदूळ आणि पाणी ओवाळून ते बाहेर टाकून द्यावे.
नंतर गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायांवर कोमट पाणी, दूध व पुन्हा गरम पाणी घालावे.
गणपतीला व गणपती आणणाऱ्या व्यक्तीला कुंकु लावून सुवासिंनींनी औक्षण करावे.
गणपती घरात आणून पाटावर तांदूळ पसरून त्यावर ठेवावे.
यंदा गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला जातो.