Swadesh Ghanekar
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाला यंदाही भाविकांकडून कोट्यवधींची देगणी अर्पण केली गेली.
लालबागच्या राजाला यंदाच्या गणेशोत्सवात दान म्हणून ५.६५ कोटी रुपये रोख, ४.१५ किलो सोनं आणि ६४.३२ किलो चांदी अर्पण करण्यात आली.
भाविकांनी अर्पण केलेल्या सोनं-चांदीच्या दागिन्यांची लिलावात २ कोटी ३५ लाख १८ हजार रुपयांची विक्री झाली.
लालबागच्या राजाचा यंदा ४०० कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला होता.
मुंबई लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धर्मादाय आणि शैक्षणिक उपक्रमांना निधी देण्यासाठी देणग्यांचा वापर करतात.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या निधीचा वापर सामाजिक कार्यासाठी वापरतात...
मंडळ लालबागचा राजा प्रबोधिनी चालवतात. ज्याच्या मार्फत साने गुरुजी अभ्यासिका, स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय आणि स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती यांसारखे उपक्रम राबवले जातात.
मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजनही केले जाते.
मंडळाचे एक डायलिसिस केंद्र आहे आणि ज्यासाठी देणगी स्वरूपात येणाऱ्या निधीचा बराचसा भाग वापरला जातो.