पुजा बोनकिले
यंदा गणेशोत्सवाला ७ सप्टेंबराला सुरूवात झाली.
ज्याप्रमाणे वाजच गाजत बाप्पाचे आगमन झाले त्याचप्रमाणे वाजत-गाजत विसर्जनला सुरूवात झाली आहे.
मुंबई-पुण्यात गणेश भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहे.
पुण्यातील रस्त्यावर सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे.
पुण्यातील अलका टॉकीज चौकात भव्य रांगोळी काढण्यात आली असून १०० फूट लांब आकाराची आहे.
गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करताना लहान मुले सोबत असेल तर लक्ष द्या.
बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करताना पाण्याची खोली लक्षात घेऊनच पाण्यात उतरावे.
तुम्हाला पोहता येत नसेल तर पाण्यात जाऊ नका.