Sandip Kapde
गणपती बाप्पा म्हटलं की आपण मोरया म्हणतो, अशी प्रथाच आता पडली आहे. ७ सप्टेंबरला गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत
गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते या मागचा इतिहास हा फार कमी लोकांनाच माहिती आहे.
गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे 600 वर्ष जुनी कहाणी आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे.
1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक परम भक्त होते.
ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते.
मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. असे सांगितले जाते की, वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले.
परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते.
एके दिवशी श्रीगणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले.
कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती. देवांनी त्यांना दर्शन दिले.
ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. त्यानंतर यांची समाधीही येथे बांधण्यात आली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते.
गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशाप्रकारे जोडले गेले आहे की, लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात.
पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.