गौतम अदानींचे शिक्षण किती?

Monika Lonkar –Kumbhar

गौतम अदानी

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून गौतम अदानींना ओळखले जाते. त्यांचा बिजनेस अनेक देशांमध्ये पोहोचला आहे.

कुठे झाला जन्म?

गौतम अदानी यांचा जन्म २४ जून १९६२ मध्ये गुजरामधील अहमदाबाद शहरात एका मध्यमवर्गीय जैन कुटुंबात झाला होता.

कौटुंबिक पार्श्वभूमी

गौतम यांचे वडिल शांतिलाल हे कपड्यांचे व्यापारी होते, तर त्यांच्या आईचे नाव शांती असे होते. त्यांना सात भाऊ-बहिण आहेत.

गौतम अदानींचे शिक्षण किती?

गुजरातमधील शेठ चिमणलाल नांगिदास या शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

कॉलेज ड्रॉपआऊट

गौतम यांनी गुजरात विद्यापीठात बीकॉमसाठी प्रवेश घेतला होता. परंतु, दोन वर्षांतच त्यांनी कॉलेज सोडले.

व्यवसायात पदार्पण

कॉलेजला रामराम ठोकल्यानंतर गौतम यांनी महेंद्र ब्रदर्ससाठी हिऱ्यांना पैलू पाडण्याचा व्यवसाय सुरू केला.

एकूण संपत्ती

त्यांचा हा हिऱ्यांचा व्यवसाय सातासमुद्रापार पोहचला असून ते आशियातील आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. अदानींची एकूण संपत्ती 111 अब्ज डॉलर आहे.

मेरे खयालों की मलिका..!

Prajakta Gaikwad | esakal
येथे क्लिक करा.