Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ जून २०२४ च्या अखेरीस संपणार आहे.
त्यामुळे बीसीसीआय लवकरच नवीन प्रशिक्षकाची घोषणा करणार आहे.
या पदासाठी उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्याचे समजले असून या पदासाठी गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे.
आता याबद्दल गंभीरने इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या एका कार्यकमात सांगितले की 'मी इतका पुढचा विचार करत नाहीये. तुम्ही मला सर्व कठीणच प्रश्न विचारताय.'
तसेच त्याने राईज टू लीडरशीप या कार्यक्रमात प्रशिक्षकपदाबद्दल भाष्य करताना म्हटले, 'सर्व उत्तरं देणं कठीण आहे. मी फक्त इतकं सांगतो की मी आत्ता खूश आहे. मी नुकताच चांगला प्रवास केला आहे आणि त्याचा आनंद घेत आहे.'
कोलकाता नाईट रायडर्सने नुकतेच गंभीर मेंटॉर असताना आयपीएल २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.
दरम्यान बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार नव्या प्रशिक्षकाच्या कार्यकाळ हा साडेतीन वर्षांचा असणार आहे. म्हणजेच डिसेंबर 2027 पर्यंत या प्रशिक्षकाचा कार्यकाळ असेल.