गंभीर - श्रीसंतचा वाद झालेल्या LLC चा मालक आहे तरी कोण?

अनिरुद्ध संकपाळ

गौतम गंभीर आणि श्रीसंत यांच्या वादामुळे लेजंड लीग क्रिकेट स्पर्धा चर्चेचा विषय ठरली आहे.

लेजंड लीग क्रिकेट स्पर्धा ही फ्रेंचायजी बेस स्पर्धा असून अबसोल्युट लेजंड स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे याची मालकी आहे. या लीगमध्ये चार संघ आहेत.

इंडिया कॅपिटल्सची मालकी ही जीएआर स्पोर्ट्सलाईनकडे आहेत. ते आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक आहेत.

दुसरा संघ गुजरात जायंट्सची मालकी ही अदानी स्पोर्ट्सलाईनकडे आहे. वुमन्स प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्सचा संघ देखील यांच्याकडे आहे.

भिलवारा किंग्जचे मालकी हक्क हे एलएलजे भिलवारा ग्रुपकडे आहे.

मनिपाल टायगर्सची मालकी ही मनिपाल एज्युकेशन अँड मेडिकल ग्रुपकडे आहे.

गेल्या हंगामापासून या लीगमध्ये अजून दोन संघ समाविष्ट झाले आहेत. अर्बनराईजर्स हैदराबद या संघाची मालकी अर्बनराईज ग्रुपकडे आहे.

साऊथ सुपर स्टार ही संघ कोएलओ स्पोर्ट्स आणि रनजीत राठोड यांच्या मालकीचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.