सकाळ वृत्तसेवा
आज महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दहिहंडीचा जल्लोष पाहयला मिळत आहे. यानिमित्त प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असते.
आज मुंबईतील मागाठाणे येथे प्रकाश सुर्वे यांच्या दहिहंडी कार्यक्रमासाठी गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
गौतमीचा डान्स पाहण्यासाठी यावेळी तरूणींनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी गौतमीच्या डान्ससोबत तिच्या कपड्यांची देखील जोरदार चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.
या कार्यक्रमासाठी गौतमीने खास डिझाईन असलेला ब्लाउज घातला होता, या कार्यक्रमातील गौतमीचे फोटो आता समोर आले आहेत.
यावेळी राधा-कृणाची सुंदर प्रतिमेचं डिझाईन असलेला ब्लाऊज गौतमीने परिधान केला होता.
यावेळी गौतमीने केसांची अनोखी हेअरस्टाईल केली होती तसेच तिच्या नकातील मोत्यांची नथ देखील लक्ष वेधून घेत होती.
गौतमीची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळते, अनेक मोठ्या कार्यक्रमात तीच्या डान्सचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
राज्यातील कोणत्याही कोपऱ्या गौतमीचा कार्यक्रम असेल तर तिला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी गोळा होते. दहिहंडीच्या दिवशी देखील अनेक बड्या नेत्यांकडून गौतमीला बोलवण्यात येते.
सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक असतात खास; 'असा' असतो स्वभाव