Anuradha Vipat
रितेशच्या कुटुंबीयांशी जिनिलीयाचं फार सुंदर नातं आहे.
आज लाडक्या सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने खास पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जिनिलीयाने लाडक्या सासूबाईंबरोबर खास फोटो शेअर करून “आईविना मला करमत नाही…” हे गाणं लावलं आहे.
तसेच जिनिलीयाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “प्रिय आई… माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला नेहमी योग्य व सन्मानाने पुढे जाण्याचा मार्ग दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
पुढे जिनिलीयाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आम्ही कायम तुमचं अनुकरण करू
आता जिनिलीयाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रितेशशी लग्न झाल्यावर जिनिलीयाने मराठी परंपरा, सण या सगळ्या गोष्टी मोठ्या आवडीने आत्मसात केल्या आहेत .