Anuradha Vipat
आज फादर्स डे निमित्त आपल्या वडिलांना शुभेच्छा देणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
मराठी कलाविश्वात देखील मोठ्या आनंदाने हा दिवस साजरा करण्यात येत आहे.
अभिनेत्री जिनिलीया देशमुखशीने एक खास पोस्ट शेअर करत रितेशला फादर्स डे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
जिनिलीयाने या पोस्टबरोबर रितेश आणि त्यांच्या मुलांचे फोटो शेअर केले आहेत.
जिनिलीया लिहिलं आहे, “जेव्हा मी या फोटोंकडे पाहते तेव्हा मला असं वाटतं की, हे फोटो किती परिपूर्ण आहेत. या फोटोंमध्ये माझ्यासह इतर कोणालाही जागा नाहीये
तुम्ही तिघे एकमेकांसाठी इतके जास्त परिपूर्ण आहात. प्रेम ज्याला मर्यादा नसतात असं आपण नेहमी वाचतो पण, तुमच्याकडे पाहून ते सिद्ध होत असंही पोस्टमध्ये जिनिलीयाने लिहिलं आहे
“रियान, राहिलचे बाबा रितेश देशमुख… तुम्ही आपल्या मुलांना लाभलेलं खूप मोठं आणि सुंदर गिफ्ट आहात. त्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर राहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू” अशी पोस्ट जिनिलीयाने शेअर केली आहे.