साक्षी राऊत
प्रत्येकांस फिरायला आवडतं. काही लोक दरवर्षी जगातील वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोअर करत असतात. प्रत्येक देशानुसार त्यांचे काही नियम असतात जे पर्यंटकांनासुद्धा पाळावे लागतात.
जर तुम्हीही विदेशात जाण्याचा प्लान करत असाल तर जाण्याआधी त्यांचे काही गजब रूल्स तुम्हाला आधीच जाणून घ्यायला हवेत. नाहीतर तुमच्यावरही जेलबंद होण्याची वेळ येऊ शकते.
वर्ष २०२१ मध्ये सिंगापूर देशाने च्यूइंगम विकण्यावर आणि खरेदी करण्यावर बंदी घातली होती. जर या देशात कोणी च्यूइंगम खाताना पकडला गेला तर त्याला ६० लाख रुपयांपर्यंतची पेनाल्टी भरावी लागू शकते.
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समध्ये सिगारेट पिऊन जर रस्त्याच्या कडेला फेकून दिली तर तुम्हाला ३ लाखांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. लोकांना प्रदूषण वाढवण्यापासून रोखण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलाय.
जपानमध्ये पेनकिलर किंवा विक्स इन्हेलर सारख्या काही औषधांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. चुकून तुम्ही पकडले गेल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
२०१५ वर्षात स्पेनने घरावर सोलर पॅनल लावल्यास अतिरिक्त कर वसूलण्याचा नवा नियम बनवला होता. त्यानुसार सोलर पॅनरचा वापर करत पकडले गेल्यास तुम्हाला अतिरिक्त टॅक्स भरावा लागेल.
दुबईमध्ये पब्लिक प्लेसवर प्रेम व्यक्त केल्यास आणि पार्टनरला किस केल्यास तुम्हाला जेलमध्येही जावं लागू शकतं.
स्वित्झरलंडमध्ये जर तुम्हाला टीव्ही बघायची असेल तर तुम्हाला लायसंस घ्यावं लागेल. इथे लोकांना स्विस नॅशनल ब्रॉडकास्टरसाठी ३० हजार रुपये शुल्क भरावा लागतो.
स्वित्झरलँडमध्ये रात्री १० नंतर टॉयलेट फ्लश करणे नियमबाह्य आहे. याने ध्वनी प्रदूषण वाढतं अशी सरकारची विचारधारणा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.