डेव्हिड वॉर्नरची संघात आता 'नो एन्ट्री'

Kiran Mahanavar

ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंड आणि इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी संघांची घोषणा केला आहे.

David Warner

यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनाबद्दलही स्पष्ट माहिती दिली आहे.

David Warner

वॉर्नरने यावर्षाच्या सुरुवातीलाच कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्त झाला होता.

David Warner

मात्र, त्याने निवृत्तीबद्दल केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, तो आता फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे, पण जर निवड झाली, तर उपलब्ध असेल.

David Warner

अखेर बेली यांनी त्यावर पूर्णविराम लावताना सांगितले की वॉर्नरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून त्याचा आता भविष्यात विचार केला जाणार नाही.

George Bailey

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला इंग्लंड आणि स्कॉटलंड दौऱ्यासाठी पूर्ण विश्रांती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाला स्कॉटलंडविरुद्ध तीन टी२० सामने खेळायचे आहेत, तर इंग्लंडविरुद्ध तीन टी२० आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.

David Warner | sakal

Wimbledon 2024 विजेत्या अन् उपविजेत्यांना कोट्यवधींचे बक्षीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Carlos Alcaraz, Barbora Krejcikova | Sakal
येथे क्लिक करा