साक्षी राऊत
आज बाप्पाच्या आगमनानिमित्य सगळीकडे जोरदार तयारी चालली आहे. यावेळी घरच्या महिला आणि पुरुष ट्रॅडिशनल लुकमध्ये असतात.
महिलांचा यावेळी हटके दिसण्याचा प्लान असतो. तेव्हा यंदाच्या गणेश उत्सवात तुम्हालाही हटके दिसायचं असेल तर या काही अभिनेत्रींच्या साड्या बघून तुम्हाला थोडी मदत होईल.
लालकंच साडी नेसून तुम्ही हटके दिसू शकता. सोबतच त्यावर गोल्डन ज्वेलरी उठून दिसेल.
बुट्टे असलेली डिझायनर साडीसुद्धा उठून दिसते.
महाराष्ट्रीयन लुक आणि चंद्रकोर असे एकंदरीत लुकमध्ये तुम्ही युनिक दिसाल.
काठाची साडी सणांच्या दिवसांत अगदी सुंदर दिसते. आणि बऱ्याच महिलांची घरातील धर्मकार्यात किंवा महत्वाच्या कार्यक्रमांत बॉर्डर्ड साडी घालण्यास पसंती असते.
ही बारीक खणांची साडी अंगावर उठून दिसण्याबरोबरच युनिक लुक देते. ही साडीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.