kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं 14 ऑक्टोबरला निधन झालं.
गेला बराच काळ ते कॅन्सरचा सामना करत होते. त्यातून ते मुक्त झाले होते पण पुन्हा त्यांचं आजारपण बळावलं.
मृत्यूपूर्वी त्यांनी एका सिनेमाला त्यांचा आवाज दिला होता. हा सिनेमा होता घरत गणपती.
कोकणातील गणेशोत्सव, नात्यांमध्ये आलेले दुरावे यावर हा सिनेमा बेतला होता.
अतुल यांनी या सिनेमात गणपतीच्या पात्राला आवाज दिला होता. घरत कुटूंबाची कथा सांगणारी गणपतीची मूर्ती असं साधारण या सिनेमाचं कथानक होतं.
या सिनेमाचा दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकरने अतुल यांच्यासाठी खास पोस्ट शेअर लिहीत त्यांनी या सिनेमातील गणपतीच्या पात्राला आवाज दिल्याचं उघड केलं.
अतुल यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.