साक्षी राऊत
आलं लसूण आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. मात्र याचे लोणचे बनवूनही खाणेदेखील तेवढेच आरोग्यदायी आहे. चला तर आलं-लसणाचे लोणचे खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम, झिंक, लोह यांसारखे पोषक तत्व आल्यामध्ये असतात.
आलं-लसणाचे लोणचे इम्युन सिस्टिमसाठी फार आरोग्यदायी असते. यात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सीची मात्रा अधिक प्रमाणात असते. इम्युनिटी वाढवण्यासाठी ते उत्तम ठरू शकते.
आलं लसणाचे लोणचे खाल्ल्याने हृदयासंबंधित आजाराचा धोका कमी होतो. फक्त लोणच्यात तेल जास्त प्रमाणात नसावे याची काळजी घ्यावी.
हे लोणचे खाणे हाडांसाठी आणि पायांच्या दुखण्यासाठीही आरामदायी आहे. यात अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे पायांच्या दुखण्यासोबतच सूजन कमी करण्यासही मदत करते.
असुरळीत ब्लड सर्क्युलेशन अनेक समस्यांचे कारण बनू शकते. जर तुमचे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत नसेल तर आलं आणि लसणाचे लोणचे खाऊन तुम्ही ब्लड सर्क्युलेशन सुरळीत ठेवू शकता.
जर तुम्ही मधुमेहाचे रूग्ण असाल तरी तुम्ही या लोणच्याचे सेवन करू शकता. मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास तुमची शुगर लेव्हलही वाढणार नाही.
उन्हाळ्याच्या दिवसांत आलं लसणाचे लोणचे खाल्ल्यास मोठे नुकसान होऊ शकते. लोणचे उष्ण असते. त्यामुळे जास्त खाल्ल्याने पोटात जळजळ, हार्ट बर्न यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.