सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री गिरीजा ओकच्या विधानाची कालपासून चर्चा होत आहे
एका मुलाखतीत तिने हसून बोलणाऱ्या महिलांकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं असं म्हटलं आहे
''वर्कस्पेसमध्ये चांगलं बोलणाऱ्या, हसून लगेच मैत्री करणाऱ्या महिलांकडे उगाचच एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं.'' असं ती म्हणते
त्यामुळे कुणाशीच बोलू नये, कुणाशीच नीट वागू नये असा एक दबाव निर्माण व्हायला लागतो, असंही तिने सांगितलं
परंतु सर्वांनी यापलीकडचा विचार करावा आणि कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण ठेवावं, अशी अपेक्षा गिरीजा व्यक्त करते
गिरीजा म्हणते त्याप्रमाणे महिलांना कामाच्या ठिकाणी त्रास झाल्याचे अनेक प्रकार आपल्याकडे घडत असतात
सरकारी कार्यालय किंवा खाजसी संस्था सोडल्या तर कार्पोरेटमध्ये बऱ्यापैकी वातावरण सुधारलं आहे
तरीदेखील एवढ्या मोठ्या अभिनेत्रीला जर असा त्रास होत असेल खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे